Wednesday, August 4, 2021

भस्मासुर

आजची वात्रटिका
---------------------

भस्मासुर

उलट नवे रूप घेऊन येतोय,
पण रगेल कोरोना जात नाही.
दोन दोन डोस देऊन-घेऊनही,
कोरोना काही भीत नाही.

आपली सरळ सरळ लढाई,
कोरोनाचा गनिमी कावा आहे.
जशी फोल ठरतेय दवा,
तशीच धोक्यात दुवा आहे.

आपला बचावाचा पवित्रा,
कोरोनाचा आक्रमक नूर आहे!
चीनला सुद्धा कळून चुकले,
कोरोना हा भस्मासुर आहे!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6225
दैनिक पुण्यनगरी
4ऑगस्ट 2021

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025वर्ष- चौथेअंक - 306 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका - मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव दैनिक आजचा अंक  दैनिक वात्रटिका l 5 एप्रिल2025 वर्ष- चौथे अंक - 306 वा l पान...