Thursday, August 5, 2021

नकार घंटा

आजची वात्रटिका
--------------------

नकार घंटा

जेंव्हाचे असतात गहू,
तेंव्हाच्याच पोळ्या असतात.
नाहीतरी आश्वासने म्हणजे,
ढगांमध्ये गोळ्या असतात.

आश्वासनांचे गोळीबार,
सारखेच जारी असतात !
न कर्त्याचे मुहूर्त,
नेमके शनिवारी असतात !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6226
दैनिक पुण्यनगरी
5ऑगस्ट 2021

 

No comments:

daily vatratika...3april2025