आजची वात्रटिका
---------------------
वेडेपणा
वेड्यांचा वेडेपणा नाहीतर,
शहाण्यांचा वेडेपणा नडतो आहे.
वेड्यांचा नाही शहाण्यांचाच,
वेडेपणा वेगाने वाढतो आहे.
वेड्यांना आपला वेडेपणा,
कळत नाही आणि छळत नाही!
शहाण्यांना मात्र आपला वेडेपणा,
कळत असला तरी वळत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7674
दैनिक झुंजार नेता
13ऑगस्ट 2021

No comments:
Post a Comment