Showing posts with label पाटोदा(बीड). Show all posts
Showing posts with label पाटोदा(बीड). Show all posts

Friday, October 29, 2021

कोरोनाचा काळाबाजार.. मराठी वात्रटिका

--------------------------------

कोरोनाचा काळाबाजार

इकडे कोरोनामुळे,
प्रत्येक जण बेजार आहे.
तिकडे मात्र कोणाच्या नावावर,
चक्क काळाबाजार आहे.

कोरोना हा असा,
एकच आजार आहे!
ज्याच्या प्रत्येक गोष्टीत,
मोठा काळाबाजार आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7597
दैनिक झुंजार नेता
20मे2021
-------------------

 

Thursday, August 26, 2021

प्लस-मायनस...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

प्लस-मायनस

कोणाच्या तिसऱ्या लाटेची,
तिसरी घंटा वाजू लागली.
कोरोना गेला म्हणणारात,
मोठी खळबळ माजू लागली.

जसी लसीवर नवी लस आहे,
तसा कोरोनालाही जोश आहे !
पेशंटचा आकडा मायनस तरी,
कोणाकडे मात्र डेल्ट प्लस आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-7685
दैनिक झुंजार नेता
26ऑगस्ट 2021

 

Monday, August 16, 2021

मला एक चानस....मराठी वात्रटिका



आजची वात्रटिका

-------------------

मला एक चानस....

आमची उत्सुकता,
अखेर शिगेला लागली .
ती बारा लाख माणसे,
अखेर कोणत्या उद्योगला लागली?

य चमत्कारी उद्योहाचे
आता खरे लफडे आहे !
बारा लाख मराठी माणसाचे
जगजाहीर डफडेआहे !

-सूर्यकांत डॊळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-6228
दै.झुंजार नेता
6मे 2021

 

पर्याय...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

पर्याय

एक होती म्हतारी,
तिला कोरोना झाला.
म्हातारीने मग,
एकच जल्लोष केला.

जे कुणालाच जमले नाही,
ते म्हटरीला जमले होते !
म्हरारीचे मन,
कोरोनात रमले होते !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
चिमटा-6135
दैनिक पुण्यनगरी
5मे2021
 

कोरोना लॉबी....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका

--------------------------

कोरोना लॉबी

वाईट तर होताच,
त्याहून तो गंदा झाला.
कोरोना नावाचा रोग
जबरदस्त धंदा झाला.

कोरोनाहूनही वाईट,
समस्या समोर उभी आहे!
कोरोनापेक्षा वेगाने पसरतेय,
ती कोरोना लॉबी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
चिमटा-6135
दैनिक पुण्यनगरी
3मे2021

 

Friday, August 13, 2021

वेडेपणा....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

वेडेपणा
वेड्यांचा वेडेपणा नाहीतर,
शहाण्यांचा वेडेपणा नडतो आहे.
वेड्यांचा नाही शहाण्यांचाच,
वेडेपणा वेगाने वाढतो आहे.

वेड्यांना आपला वेडेपणा,
कळत नाही आणि छळत नाही!
शहाण्यांना मात्र आपला वेडेपणा,
कळत असला तरी वळत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7674
दैनिक झुंजार नेता
13ऑगस्ट 2021

 

Saturday, July 10, 2021

न्याय-अन्याय

आजची वात्रटिका
--------------------

न्याय-अन्याय

न्याय आणि अन्याय करूनच,
राजकारण साधले जाते.
कुणाला ते मानवते तर,
कुणाकुणाला ते बाधले जाते.

न्याय-अन्यायाची बाधा होताच,
चर्चेला पंख फुटू लागतात !
कुणी करतो कंठशोष,
कुणाचे कंठ दाटू लागतात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7643
दैनिक झुंजार नेता
10जुलै2021

 

Saturday, March 27, 2021

लॉकडावूनचा फेरा

आजची वात्रटिका
------------------------

लॉकडावूनचा फेरा

जमावबंदी,संचारबंदी,
कुठे लॉक डाऊनचा फेरा आहे.
कुणाच नकारात्मक,
कुणाचा सकारात्मक शेरा आहे.

विरोध आणि समर्थन,
यात लॉकडावून जारी आहे !
तो मात्र गोंधळलेला,
ज्याला जिंदगी प्यारी आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------
फेरफटका-7559
दैनिक झुंजार नेता
27मार्च2021

 

Friday, January 29, 2021

भुतावळ

आजची वात्रटिका
----------------------------
भुतावळ
काही काही प्रश्न असे की,
जे कधीच सुटले नाहीत.
भूतं बनून मागे लागले तरी,
ते कधीच खुटले नाहीत.
जुन्याच प्रश्नांची भुतावळ,
राहून राहून अंगात येते !
उतारा कुणाकडेच नसल्याने,
मग राजकारण रंगात येते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
चिमटा-6045
दैनिक पुण्यनगरी
29जानेवारी2021

 

Tuesday, March 3, 2009

पाकिस्तानचे भविष्य़

पाकिस्तानचे भविष्य़

विश्वास,शांतता,माणुसकीची
तिथे दाणादाण होत आहे
पाकिस्तान पाकिस्तान राहिला नाही
त्याचे अतिरेकिस्तान होत आहे.

त्यांनी त्यांचा घात केला
त्यात अतिरेक्यांचा काय दोष होता?
इतिहासात एकच ओळ असेल
इथे पाकिस्तान नावाचा देश होता!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबा.९९७०४०८९२५

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...