Sunday, June 14, 2026

दुष्काळी संकेत....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
दुष्काळी संकेत
अल निनोच्या सावटात,
जांभळांचा सडा आहे.
धास्तावणाऱ्या मान्सूनचा,
नन्नाचा पाढा आहे.
जांभळीच्या झाडाखाली,
दुष्काळाचा ढोल आहे.
जिकडे बघावे तिकडे,
हरवलेली ओल आहे.
माणसाला निसर्गाचा,
सांगा कुठे धाक आहे?
जियो और जीने दो,
निसर्गाची हाक आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------,
फेरफटका- 9307
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
14 जून 2026

 

No comments:

स्वातंत्र्योत्तर जबाबदारी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ स्वातंत्र्योत्तर जबाबदारी स्वातंत्र्य नावाच्या आयत्या पिठावर, तुमचे आमचे रेघा ओढणे चालू आहे. क...