Monday, June 29, 2026

गद्दारांचा उद्धार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
गद्दारांचा उद्धार
इकडूनही उद्धार केला जातो,
तिकडूनही उद्धार केला जातो.
उद्धाराचा दुहेरी अनुभव,
सर्वच गद्दारांना आला जातो.
इकडच्या आणि तिकडच्या,
उद्धारात टोकाचा फरक आहे.
इकडचा उद्धार मारक तर,
तिकडचा प्रगती कारक आहे.
एकीकडे भडकलेला तर,
दुसरीकडे टेकवलेला माथा आहे!
राजकीय गद्दाराच्या उद्धाराची,
अक्षरशः द्विअर्थी कथा आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9322
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
29 जून 2026

 

No comments:

गद्दारांचा उद्धार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- गद्दारांचा उद्धार इकडूनही उद्धार केला जातो, तिकडूनही उद्धार केला जातो. उद्धाराचा दुहेरी अनुभव, सर्वच गद्...