Friday, June 26, 2026

वाचाळवीरांचे पराक्रम..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका.

आजची वात्रटिका
--------------------
वाचाळवीरांचे पराक्रम
ऑन कॅमेरा शिव्या देण्याची,
राजकीय स्पर्धा रंगली आहे.
सत्तेच्या मस्तीने आपली अब्रू,
वेशीवरती जाहीर टांगली आहे.
वाचाळवीरांना वाटू लागले,
आपण दात घशात घातले आहेत.
त्यांचे तेच सांगू लागले,
कुणी बोटे कशात घातले आहेत ?
बोलून सवरून नामानिराळे,
पुन्हा दिलगिरीचा खुलासा आहे!
जणू सत्तेच्या मस्तीचा,
लोकशाहीला खोटा दिलासा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9319
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
26 जून 2026

 

No comments:

वाचाळवीरांचे पराक्रम..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका.

आजची वात्रटिका -------------------- वाचाळवीरांचे पराक्रम ऑन कॅमेरा शिव्या देण्याची, राजकीय स्पर्धा रंगली आहे. सत्तेच्या मस्तीने आपली अब्रू, ...