आजची वात्रटिका
--------------------------
राजकीय आश्रय
सामाजिक असहिष्णूतेचे,
भलतेच परिणाम व्हायला लागले.
स्वतंत्र विचाराचे लोकही,
राजकीय आश्रयाला जायला लागले.
एकदा राजकीय आश्रय घेतला की,
स्वतंत्र विचारही नष्ट होऊन जातो.
कितीही सावरासावर केली तरी,
कातडी बचाऊपणा स्पष्ट होऊन जातो.
इतरांना काहीही पटले नाही तरी,
ज्याचे त्याला बरोबर पटले जाते!
आपल्या कातडी बचाऊपणाला,
आपली भूमिका घेणे असे म्हटले जाते !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9301
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
8 जून 2026

No comments:
Post a Comment