आजची वात्रटिका
--------------------
लग्नाळूंसाठी इशारा
लग्न पहावे करून...
याचा अर्थ खूप मोठा आहे.
आपल्या भावी जोडीदाराचा,
पद्धतशीरपणे काटा आहे.
जोडीदाराचा काटा काढण्यात,
भावी वर वधू मागे नाहीत.
त्यांचा त्यांचा गेम ठरलेला,
जे भावी स्वप्नातून जागे नाहीत.
स्टोऱ्या खऱ्या असल्या तरी,
सगळे गेम मात्र फिल्मी आहेत !
प्रेमासाठी वाटेल ते...
सर्वांचे कार्यक्रम एक कलमी आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9318
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
25 जून 2026

No comments:
Post a Comment