Wednesday, June 24, 2026

गद्दारीची पावती ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------
गद्दारीची पावती
सत्तेचे आणि विकासाचे,
मोठे अर्थपूर्ण नाते आहे.
म्हणूनच विरोधकांच्या नावे,
कायम उधारीचे खाते आहे.
सत्तेमध्ये घुसणाऱ्यांना,
अचानकपणे जाग आहे.
पक्षांतराचे कारण म्हणे,
विकासाचा बॅकलॉग आहे.
गद्दारीचे संशय वातावरण,
त्यांच्या अवती भवती आहे !
विकासाच्या नावावर,
त्यांच्या गद्दारीची पावती आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9317
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
24 जून 2026
----------------

 

No comments:

गद्दारीची पावती ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- गद्दारीची पावती सत्तेचे आणि विकासाचे, मोठे अर्थपूर्ण नाते आहे. म्हणूनच विरोधकांच्या नावे, कायम उधारीचे ख...