Tuesday, June 16, 2026

जळ जळीत सत्य ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
जळ जळीत सत्य
कुठे जळाल्या फाईल,
कुठे ईव्हीएम मशीन जळाल्या आहेत.
लोकांच्या शंका कुशंकांना,
नव्याने चालना मिळाल्या आहेत.
लोकांच्या मनात आग आग झाली,
कुणाकुणाच्या नाकातोंडात धूर आहे.
सगळ्यांच्याच जळफळाटातून,
अगदी एकसारखाच सूर आहे.
जसा आगीशिवाय धूर येत नाही,
तशी धुराशिवाय आग लागत नाही !
एकदा अपघात म्हणून सिद्ध केले की,
पुन्हा कुणी संशयानेही बघत नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9309
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
16 जून 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...