Sunday, June 30, 2019

मंगल वार्ताआ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
मंगल वार्ता
बैठका झाल्या,
सुपारी फुटली,
कुठे कुठे साखरपुडा आहे.
जिथे मागणी जास्त,
तिथे मात्र राड्यावर राडा आहे.
कुठे टिळ्यात कुंकू,
कुठे कुंकवात टिळा आहे !!
विधानसभेच्या मुहूर्ताआधीच,
हनिमूनचा सोहळा आहे !
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6993
दैनिक झुंजार नेता
30जून2019
--------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------
suryakantdolase.blogspot.com
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

क्रिकेटचे रंग ढंगआ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
क्रिकेटचे रंग ढंग
कलरफुल होता होता,
सगळे क्रिकेटच चेंज झाले.
भारतीय टीमच्या जर्सीचे रंगही,
आता ब्ल्यू कम ऑरेंज झाले.
क्रिकेटच्या धर्मयुद्धाला आता,
खरोखर धार्मिक रंग येईल !
आयसीसीच्या रंगबाजीने
इथे वातावरण तंग होईल !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5493
दैनिक पुण्यनगरी
30जून2019
--------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
suryakantdolase.blogspot.com
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

Saturday, June 29, 2019

व्यवस्थांतरआ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
व्यवस्थांतर
कधी राजेशाहीत लोकशाही,
कधी लोकशाहीत राजेशाही असते.
लोकांच्या मताला चुना लावून,
त्यांच्या बोटावरती शाई असते.
सगळे हुकूम हाती असले की,
लोकशाहीची हुकूमशाही होते !
कसलीच हाक नाही,बोंब नाही,
त्याच्याही पुढे बरेच काही होते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6992
दैनिक झुंजार नेता
29जून2019
-----------------------------------------
चिमटा-5492
दैनिक पुण्यनगरी
29जून2019
--------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
suryakantdolase.blogspot.com
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे

पॉवर प्लेआ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
पॉवर प्ले
हाती पॉवर असली की,
पाहिजे तसे खेळता येते.
विरोधकांचा खेळ करून,
घोळ घोळ घोळता येते.
पॉवर प्लेचा कार्यक्रम
तसा पॉवरबाज असतो !
ज्यांच्याकडे जेवढी पॉवर,
तेवढा त्याचा माज असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5492
दैनिक पुण्यनगरी
29जून2019
-------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
suryakantdolase.blogspot.com
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://www.facebook.com/suryakant.dolase

भरती ओहोटी

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
भरती ओहोटी
मावळत्याचा विसर पडून,
उगवत्याची आरती असते.
विरोधकांकडे ओहोटी,
सत्ताधाऱ्यांकडे भरती असते.
भरती आणि ओहोटीत
उलट कुणी वागत नाही !
हाऊस फुल्ल चा बोर्ड,
कोणत्याही पक्षात लागत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6991
दैनिक झुंजार नेता
28जून2019
--------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------

Friday, June 28, 2019

आज रोख,उद्या उधार

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
आज रोख,उद्या उधार
विरोधकांचा मामला उधार,
सत्ताधाऱ्यांचा रोख असतो.
उधारीपेक्षा रोखीचा मामला,
स्वाभाविकच चोख असतो.
उधारीपेक्षा रोखीला
सगळेच भुलले जातात !
जे काठावरचे आहेत ते तर,
वासावरच खुलले जातात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5491
दैनिक पुण्यनगरी
28जून2019
-------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------

Thursday, June 27, 2019

आणीबाणीची वेळआ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
आणीबाणीची वेळ
नको त्याच्या, नको तिथे,
उठता बसता पाणी आहे.
याच्यापेक्षा वेगळी,
अजून कसली आणीबाणी आहे?
आणीबाणीच्या आठवणींचे
सोयीसोयीने पारायण आहे !
जो खऱ्यावर प्रकाश टाकील,
तो कळीचा नारायण आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6990
दैनिक झुंजार नेता
27जून2019
-----------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
suryakantdolase.blogspot.com
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://www.facebook.com/suryakant.dolase

प्रयत्नवादआ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
प्रयत्नवाद
सुसंस्कारांच्या माध्यमातून
दैववाद पोसला जातो आहे.
काही कविता आणि धड्यातूनही,
दैववाद घुसला जातो आहे.
काही प्रार्थना-संस्कारगीतेही,
दैववादाचे सुवाहक आहेत.
जरा थंड डोक्याने विचार करा,
जरी हे विचार दाहक आहेत.
दैववाद नको आहे,
प्रयत्नवाद रुजला पाहिजे !
मानवतेच्या विचारांसोबत
देशही भजला पूजला पाहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5490
दैनिक पुण्यनगरी
27जून2019
-------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
suryakantdolase.blogspot.com
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://www.facebook.com/suryakant.dolase

Wednesday, June 26, 2019

शेळीस इशाराआ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
शेळीस इशारा
लांडग्यांची एकी होता,
शेळीची बदनामी होते.
आपले अपुरे शेपूट मग,
शेळीच्या कुठे कामी येते?
शेळीस हे सांगणे की,
तरीही वाघ म्हणून जगले पाहिजे !
लांडग्यांना संधी मिळू नये,
एवढे सावधपणे वागले पाहिजे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6989
दैनिक झुंजार नेता
26जून2019
-------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
suryakantdolase.blogspot.com
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://www.facebook.com/suryakant.dolase

न्याय-अन्यायआ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
न्याय-अन्याय
कालच्या सामाजिक न्यायाचे,
आज सामाजिक हक्क झाले.
सामाजिक न्यायाचे धोरणही,
आश्चर्याच्या धक्क्याने थक्क झाले.
खेचाखेची,चढाओढ,
मनात असूया आणि द्वेष आहे !
सामाजिक न्यायाची निकोपता,
आता फारशी कुठे शेष आहे?
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5489
दैनिक पुण्यनगरी
26जून2019
-------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
suryakantdolase.blogspot.com
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://www.facebook.com/suryakant.dolase

Tuesday, June 25, 2019

सत्तेचे वारकरी

आ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
सत्तेचे वारकरी
काल एकाचा जयघोष होता,
आज एकाचा जयघोष आहे.
बदलल्या पालख्या, बदलले झेंडे,
नव्या दिंडीमध्ये नवा जोश आहे.
वरवर नवखेपणा असला तरी,
आतून मात्र जो तो अट्टल आहे !
सत्ता हीच त्यांची पंढरी,
अन सत्ता हाच त्यांचा विठ्ठल आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6988
दैनिक झुंजार नेता
25जून2019
-------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले
--------------------------------
suryakantdolase.blogspot.com
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://www.facebook.com/suryakant.dolase

नववधू पलायनआ।ज।ची ।वा।त्र।टि।का
-------------------------------
नववधू पलायन
नववधू असल्या तरी,
आजकाल त्या बावरत नाही.
भूतकाळाची आवराआवर करून,
स्वतःला मुळीच सावरत नाहीत.
प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणीत,
जुनीच कॅसेट पुन्हा लावतात !
हळद फिटण्या अगोदरच,
आपल्या कुंकवाला चुना लावतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------------
चिमटा-5488
दैनिक पुण्यनगरी
25जून2019
--------------------------------------
#आजच्यावात्रटिका
#वात्रटिका
#सूर्यकांतडोळसे
#मल्टीमीडिया_वात्रटिका
#चेंडूचीफुले 
--------------------------------
suryakantdolase.blogspot.com
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://www.facebook.com/suryakant.dolase

Monday, June 24, 2019

रामबाण उपायआ।ज।ची।वा।त्र।टि।का
-------------------------------
रामबाण उपाय
एकाच भात्यात
जेवढे जास्त बाण असतात.
तेवढी जास्त ताणाताणी,
तेवढे जास्त ताण असतात.
बाणांच्या ताणा-ताणीवर,
रामबाण उपाय काढला जातो !
आपलाच बाण मग,
आपल्याच बाणावर सोडला जातो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
फेरफटका-6987
दैनिक झुंजार नेता
24जून2019
--------------------------------------
माझ्या वात्रटिका शेअर करण्यासाठी कुठल्याही परवानगीची गरज नाही.
वात्रटिका जशी आहे तशी आणि माझ्याच नावासह शेअर करायला,संदर्भासाठी वापरायला हरकत नाही.
खूप जण मोठ्या प्रमाणात शेअर करीत आहेत.इतरांनीही ते करावे अशी अपेक्षा आहे.
सर्वांचे पुन्हा एकदा आभार.
-सूर्यकांत डोळसे
https://www.facebook.com/suryakant.dolase

शेतकऱ्यांची लढाई

आजची वात्रटिका ----------------------- शेतकऱ्यांची लढाई आम्हीच शेकऱ्यांचे पाठीराखे, केवळ बढायावर बढाया आहेत. अनेक आघाड्यांवरती, शेतकऱ्यांच्...