Monday, July 6, 2020

विरोधकांची धडाडी

आजची वात्रटिका
-----------------------------
विरोधकांची धडाडी
कालचे सत्ताधारी,
आज कडक भासू लागतात.
विरोधी बाकावर बसले की,
खरे धडाडीचे दिसू लागतात.
विरोधकांची धडाडी बघून,
लोकसुद्धा थक्क होतात !
जबाबदारीपेक्षाही श्रेष्ठ,
मागण्या आणि हक्क होतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7335
दैनिक झुंजार नेता
6जुलै 2020

राजकीय हंगाम

आजची वात्रटिका
------------------------------------
राजकीय हंगाम
कुणाची चिखलफेक चालू,
कुणाकडून मी..मी,तू..तू आहे.
राजकारणाचे असे नाही की,
त्याचा ठराविक एक ऋतू आहे?
ना देणे घेणे;ना सुख दुःख,
दुष्काळ वा सुकाळ असतो !
राजकारणाचा हंगाम तर,
बारा महिने तेरा त्रिकाळ असतो !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5850
दैनिक पुण्यनगरी
6जुलै2020

Sunday, July 5, 2020

कॉमन अजेंडा

आजची वात्रटिका
------------------------------------
कॉमन अजेंडा
गोष्ट जशी गंभीर असते,
गोष्ट तशी 'फुट'कळ असते.
मित्राने मित्राचे घर फोडू नये,
अशी आपली अटकळ असते.
आपल्या राजकीय मैत्रीवर,
आपल्या हाताने धोंडा असतो !
कारण आणि राजकारण हे की,
पक्षवाढ हा कॉमन अजेंडा असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7334
दैनिक झुंजार नेता
5जुलै 2020

मोबाईल गुरु

आजची वात्रटिका
------------------------------------
मोबाईल गुरु
ऑनलाईन गुरू आहेत,
ऑनलाईन शिष्य आहेत.
कोरोनाच्या धास्तीने,
हीच मोबाईल दृष्य आहेत.
अकल्पित असा बदल,
गुरू-शिष्याच्या नात्यात आहे !
नाते चिरंजीव राहील,
पण शैक्षणिक वर्ष धोक्यात आहे!!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5849
दैनिक पुण्यनगरी
5जुलै2020

Saturday, July 4, 2020

गुरुत्वाकर्षण

आ।ठ।व।णी।ती।ल
वा।त्र।टि।का
------------------------------
गुरुत्वाकर्षण
गिर्हाईकांची गर्दी बघून,
वाट्टेल ते धंदे सुरु झाले.
ज्यांची शिष्य व्हायची
लायकी नाही,
असेसुद्धा गुरु झाले.
आपण कितीही डोळे उघडा,
शिष्याची गुरूवर भक्ती असते !
शिषयांचा वेडपटपणा,
गुरूंची गुरुत्वाकर्षण शक्ती असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
चिमटा-3067
दैनिक पुण्यनगरी
3जुलै2012

पक्षीय धोरण

आजची वात्रटिका
------------------------------------
क्षीय धोरण
काही कार्यकर्ते रुजवले जातात,
काही कार्यकर्ते जोजवले जातात.
बंडाची भाषा करणारे,
डावपेच करून कुजवले जातात.
जो झिजला जातो,कुजला जायो
तो कार्यकर्त्यांचा त्याग असतो !
न्याय-अन्यायाचे एकच उत्तर,
तो पक्षीय धोरणाचा भाग असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7333
दैनिक झुंजार नेता
4जुलै 2020
आजची वात्रटिका
------------------------------------
चमत्कारिक बोधामृत
प्रबोधनाच्या नावाखाली,
थापा मारल्या जातात.
सगळ्या चमत्कारिक गोष्टी,
हळूच पेरल्या जातात.
तर्कहीन चमत्कार,
पुन्हा पुन्हा बोधले जातात !
पोटपूजेच्या साधनाबरोबर,
जुने डावही साधले जातात !
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5848
दैनिक पुण्यनगरी
4जुलै2020

टेक केअर