आजची वात्रटिका
--------------------
एक ऐतिहासिक संवाद
आपली वर्तमानात काय पत आहे?
औरंगजेब म्हणाला वाघ्याला,
तुझी आणि माझी सारखीच गत आहे.
समर्थक असोत वा विरोधक,
जे ते आपल्याच हेक्यात आहेत.
माझी कबर आणि तुझे स्मारक,
आज डोक्यात आणि धोक्यात आहेत.
काही सांगता येत नाही,
कुणाचा कसला कसला कावा आहे?
तुझी चालली, यु यु आणि हाड हाड,
माझ्या मुळावरती मात्र ' छावा' आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8868
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
26 मार्च 2025
