Wednesday, September 16, 2026

भाषिक अहंभाव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
भाषिक अहंभाव
कुणाचाही भाषा दिन असो,
एक मात्र नक्की जाणवले जाते.
भाषिक अस्मिता जागवताना,
इतर भाषिकांना हिणवले जाते.
ही पुराणातली वांगी नाहीत,
हे शिळ्या कढीला आधण नाही.
भाषा हे संवादाचे साधन आहे,
भाषा हे विसंवादाचे साधन नाही.
भाषांमध्ये भगिनींचे नाते आहे,
म्हणून हा सावत्रभाव बरा नाही !
कुणाचाही भाषिक अहंभाव,
कुणासाठीच कधीच खरा नाही !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9400
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
16 सप्टेंबर 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 54 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...