Monday, September 28, 2026

दुष्काळाच्या झळा .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
दुष्काळाच्या झळा
पावसाने आपला हात,
असा काही ताणला आहे.
पावसाळ्यासारख्या पावसाळा,
यंदा चक्क उन्हाळा बनला आहे.
आधीच पाण्याची टंचाई,
त्यात पावसाळाही कोरडा आहे.
दुष्काळातून वगळलेल्यांचा,
तालुकावार आरडाओरडा आहे.
ज्यांना निसर्गाचे इशारे कळाले,
खऱ्या अर्थाने तेच सुज्ञ आहेत !
दुष्काळाने पोळून निघालेले,
तथाकथित हवामान तज्ञ आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9411
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
28 सप्टेंबर 2026

 

No comments:

दुष्काळाच्या झळा .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळाच्या झळा पावसाने आपला हात, असा काही ताणला आहे. पावसाळ्यासारख्या पावसाळा, यंदा चक्क उन्हा...