Sunday, July 31, 2022

दोस्ती दुश्मनी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

दोस्ती दुश्मनी

त्या दोस्ताची दोस्ती,
नेहमीच शापित असते.
ज्याच्या हाती आपले,
नको ते गुपित असते.

दोस्त दुश्मन झाले की,
गुपितांचाही बोभाटा होतो!
दुश्मनीपेक्षा दोस्तीचा,
सगळ्यात मोठा घाटा होतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8001
दैनिक झुंजार नेता
31जुलै2022

 

अतिशयोक्ती ... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

अतिशयोक्ती

देणे ना घेणेआहे,
कंदील लावून येणे आहे.
बेताल वाचाळतेला,
अतिशयोक्ती लेणे आहे.

इजा,बिजा,तीजा झाले,
पुन्हा तोच तोच पाढा आहे!
आता पक्की खात्री पटली,
हा वेड्याच्या हाती पेढा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6545
दैनिक पुण्यनगरी
31जुलै 2022

 

Saturday, July 30, 2022

नाटकी निरपेक्षता.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

नाटकी निरपेक्षता

उपेक्षा आणि अपेक्षा यांचे,
खूप मोठे लागेबांधे आहेत.
तरीही अपेक्षा व्यक्त करण्याचे,
सगळ्यांचेच वांधे आहेत.

उपेक्षा सहन करूनही,
अपेक्षा नाही असे सांगावे लागते!
धावण्याची इच्छा असूनही,
खोटे खोटे तरी रांगावे लागते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6544
दैनिक पुण्यनगरी
30जुलै 2022

 

नवी सुभेदारी...आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

नवी सुभेदारी

स्थानिक राजकारण म्हणजे
संस्थानिकांचे स्वराज्य असते.
पार्टी - बिर्टी असले काही,
सगळे काही त्याज्य असते.

वर वरती पक्षाचे लेबल,
खाली संस्थानिकांची ताबेदारी असते!
आपण ज्याला लोकशाही म्हणतो,
ती तर नवी सुभेदारी असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8000
दैनिक झुंजार नेता
30जुलै2022

 

Friday, July 29, 2022

सत्ताहरणाचा परिणाम... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

सत्ताहरणाचा परिणाम

शिवसेनेची अवस्था झाली तशी,
राष्ट्रवादी आणि काँग्रेसची झाली नाही.
सत्ता तर तिघांचीही गेली,
एकट्या शिवसेनेची गेली नाही.

सत्ताहरणाचा परिणाम,
तिघांवर वेगवेगळा झाला आहे !
राष्ट्रवादी आणि काँग्रेस सावरली,
सेनेच्या अस्तित्वावरच घाला आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8000
दैनिक झुंजार नेता
29जुलै2022

 

आरक्षण सोडत.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

आरक्षण सोडत

कुणी आनंदाने उडत असते,
कुणी मनामध्ये कुढत असते.
कधी लकी,कधी अनलकी,
आरक्षणाची सोडत असते.

आरक्षणाच्या सोडतीवर,
राजकीय डाव आखले जातात!
आरक्षणाची कडू गोड फळे,
परिस्थितीनुसार चाखले जातात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6543
दैनिक पुण्यनगरी
29जुलै 2022

 

Thursday, July 28, 2022

गटारीचे बोल, मराठी वात्रटिका

मराठी वात्रटिका
---------------------

गटारीचे बोल

राजकारणावर भाष्य करायला,
मुळीच अडले नाही माझे खेटार.
गाळातून तोंड वर करीत,
गटारीवरती ओरडली गटार.

राजकारणात जो तो नंगा आहे,
विश्वास आणि निष्ठेला ठेंगा आहे.
आपल्याहीपेक्षा जास्त,
राजकारणात गटारगंगा आहे.

जो तो कायमच तुंबलेला,
किड्यांसारखे उतले मातले जाते!
बारा महिने तेरा त्रिकाळ,
आपल्यामध्ये तोंड घातले जाते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6542
दैनिक पुण्यनगरी
28जुलै 2022

 

दैनिक वात्रटिका16एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -314 वा

 दैनिक वात्रटिका 16एप्रिल2024....वर्ष- तिसरे.. अंक -314 वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1G5mOqAClp46gmC8flF6...