आजची वात्रटिका
---------------------
पॅक अनपॅक
आपल्यावरचा जीएसटी बघून,
अनपॅक वस्तूही पॅक झाल्या.
विश्वासाला तडा जाऊन,
उरल्या सुरल्या क्रॅक झाल्या.
नको त्यांना,नको तसा,
जीएसटीचा भुर्दंड आहे !
प्रामाणिक नागरिकत्वाचा,
हा कायदेशीर दंड आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7990
दैनिक झुंजार नेता
19जुलै2022
No comments:
Post a Comment