Monday, July 18, 2022

पॉलिटिकल हॅकिंग... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

पॉलिटिकल हॅकिंग

आमदार निवडून आणण्यापेक्षा,
आमदार फोडणे स्वस्त झाले.
निवडा-निवडीपेक्षा फोडाफोडीचे,
भाव रोखठोक आणि रास्त झाले.

फोडलेले आमदार म्हणजे,
रेडीमेड मालाची पॅकिंग आहे !
थोडक्यात सांगायचे झाले तर,
ही पॉलिटिकल हॅकिंग आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6532
दैनिक पुण्यनगरी
18जुलै 2022

 

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...