Tuesday, July 19, 2022

सूडचक्र... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

सूडचक्र

कधी वाटते हुडबुद्धी आहे,
कधी वाटते सूडबुद्धी आहे.
सूडाच्या राजकारणात,
रोज नव्याने वृद्धी आहे.

सूड घेणारे बालिश नाहीत,
ते तर सगळे जाणते आहेत.
सांगण्याची गरज नाही,
नेमके ते कोणते आहेत?

कधी यांची दृष्टी वक्र आहे,
कधी त्यांची दृष्टी वक्र आहे !
ही अलटा पालट सुरूच असते,
कारण हे राजकीय सूडचक्र आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6533
दैनिक पुण्यनगरी
19जुलै 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...