Saturday, July 2, 2022

सरकारी परंपरा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

सरकारी परंपरा

नवीन सरकार आले की,
निर्णयांची फेरफार केली जाते.
स्थगित असलेले निर्णय चालू,
चालूला स्थगिती दिली जाते.

सरकारी परंपरा अशी,
प्रत्येकाकडून पाळली जाते !
आपली शेकून घेत घेत,
दुसऱ्याची मात्र जाळली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6518
दैनिक पुण्यनगरी
2जुलै 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...