आजची वात्रटिका
---------------------
सिस्टिमॅटिक गाडा
आपला देश एवढा महान की,
पंतप्रधानांशिवाय कारभार होतो.
मुख्यमंत्र्यांशिवाय कारभार होतो,
हाच प्रकार अगदी वारंवार होतो.
मग मंत्री संत्री असले काय?
मग मंत्री संत्री नसले काय?
कुणाची वाट बघत बघत,
सांगा लोक कधी बसले काय?
याच्यात वास्तवता जास्त आहे,
विनोदाचा भाग अगदी थोडा आहे!
जो कुणासाठीच थांबत नाही,
असा सिस्टिमॅटिक गाडा आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7987
दैनिक झुंजार नेता
15जुलै2022

No comments:
Post a Comment