Wednesday, July 20, 2022

प्रति शिवसेना... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

प्रति शिवसेना

गल्लीतले गेले,दिल्लीतले गेले,
असेच दुर्दैवी चित्र आता आहे.
बाणामागे बाण निघून गेले,
पाठीशी शिल्लक भाता आहे .

बाणामागे बाण गेले,
तरी ताठर ठाकरी बाणा आहे!
पुन्हा एकदा शिवसेनेसमोर,
नवी प्रति शिवसेना आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6534
दैनिक पुण्यनगरी
20जुलै 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...