Thursday, July 21, 2022

नो गॅरंटी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

नो गॅरंटी

आपल्या जनतेसारखी,
जनता कपाळ करंटी नाही.
आपल्या सरकारची,
जनतेला काही गॅरंटी नाही.

सत्तेचा राजकीय संघर्ष,
आपल्याला नडू नये.
सत्तेवर कुणीही येवोत,
सरकार मात्र पडू नये.

अपेक्षांची झाली उपेक्षा,
मनामध्ये धाकधूक आहे !
राजकीय स्थिरतेवरती,
जनतेचे सुख - दुख आहे!!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7992
दैनिक झुंजार नेता
21जुलै2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 6 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 88 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...