आजची वात्रटिका
---------------------
आलटा - पालट
सरकार टिको, सरकार टिको,
असे सत्ताधारी पक्ष घोकीत आहे.
मध्यावधी निवडणूका होणारच,
असे सर्व विरोधकांचे भाकीत आहे.
आजची राजकीय स्थिती,
नेमकी कालच्यापेक्षा उलट आहे!
भाकीत आणि घोकीत एक असूनही,
भूमिकांची मात्र आलटा - पालट आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6523
दैनिक पुण्यनगरी
7जुलै 2022

No comments:
Post a Comment