आजची वात्रटिका
---------------------
खड्डे आणि भेगा
डांबरी रस्त्यांना खड्डे तर,
सिमेंट रस्त्यांना भेगा पडतात.
प्रवाशांच्या कपाळावर,
मोठ मोठाल्या रेघा पडतात.
खड्डे नको पण भेगा आवरा,
लोकांना रस्त्यांचा वीट आहे !!
खड्डे आणि रस्त्यांचे नाते,
डांबरट आणि काँक्रीट आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7997
दैनिक झुंजार नेता
25जुलै2022
No comments:
Post a Comment