Monday, July 11, 2022

कोर्ट मॅटर.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

कोर्ट मॅटर

लोकशाहीची पायमल्ली आहे,
लोकशाहीची खिल्ली आहे.
लोकशाहीच्या कुलूपाला,
न्यायालयाची किल्ली आहे.

ज्याला त्यालाआपल्या सोयीने,
लोकशाही तोडगा हवा असतो.
आपल्याला जसा पाहिजे तसा,
कोर्टाचा बडगा हवा असतो.

तुम्हीच सांगा कशाचा तमाशा?
त्याला कुठले थेटर आहे ?
त्यावर कुणीच काही बोलू नये,
जे जे काही कोर्ट मॅटर आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6527
दैनिक पुण्यनगरी
11जुलै 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025वर्ष- चौथेअंक - 244वा l पाने -51

दैनिक वात्रटिका l 1फेब्रुवारी 2025 वर्ष- चौथे अंक - 244वा l पाने -51 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1pdEGCxoCqmh185jRv5...