Friday, July 22, 2022

द्रौपदी विजय... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

द्रौपदी विजय

भारताच्या राष्ट्रपतीपदी,
द्रौपदी मुर्मू बसल्या.
आदिवासी भारतातील,
दऱ्या - खोऱ्या हसल्या.

तारपा, ढोलआणि ताशे,
आनंदाने कडाडू लागले.
अच्छे दिन आले रे आले....
आदिम सुर धडाडू लागले.

जिथे सूर्य पोहचलाच नाही,
तिथे नवा सूर्योदय होवो !
इंडिया पुढे पुढे जाताना,
भारताचाही अंत्योदय होवो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6537
दैनिक पुण्यनगरी
22जुलै 2022

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...