आजची वात्रटिका
---------------------
शिव -धनुष्य
बाण गेले निसटून,
हाती फक्त धनुष्य आहे.
ज्याच्या हातून चूका होतात,
तोच खरा मनुष्य आहे.
चुकातूच शिकावे लागेल,
नवे पाऊल टाकावे लागेल.
उद्धवा अजब तुझे सरकार,
हे रडगाणे रोखावे लागेल.
आव्हानाचे नवे शिवधनुष्य,
पुन्हा नव्याने पेलावे लागेल!
केवळ संजय उवाच नको,
आता स्वत:ही बोलावे लागेल !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6521
दैनिक पुण्यनगरी
5जुलै 2022
No comments:
Post a Comment