आजची वात्रटिका
---------------------
सेतू अभ्यासाचा हेतू
विद्यार्थी कोरोनापूर्व युगाला,
कोरोनोत्तर युगाशी सांधू लागले.
जुन्या ज्ञानाशी नव्या ज्ञानाचा,
शालेय विद्यार्थी सेतू बांधू लागले.
सेतू अभ्यास म्हणजे,
कुणा कुणाला कोडे वाटते आहे.
नेहमीच वरातीमागून येणारे,
कागदी घोडे वाटते आहे.
कुणी तोडतो अकलेचे तारे,
कुणाकडून ज्ञानाची पाजळणी आहे!
थोडक्यात सांगायचे तर,
सेतू ही अभ्यासाची उजळणी आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7983
दैनिक झुंजार नेता
11जुलै2022
No comments:
Post a Comment