Saturday, July 9, 2022

बदलता तोंडावळा .... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

बदलता तोंडावळा

झेंडे आणि गोंडे बदलले की,
त्यांची तोंडे बदलू लागतात.
जसे जुने जाणते बदलतात,
तसे तरणेबांडे बदलू लागतात.

बदल हा तर निसर्गाबरोबर,
राजकारणाचाही नियम आहे !
पण सत्ता आणि मत्ता,
यांची लालसा मात्र कायम आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7981
दैनिक झुंजार नेता
9जुलै2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...