Monday, July 4, 2022

कल्पित भविष्य... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

कल्पित भविष्य

आपण नैसर्गिक युत्या पाहिल्या,
अनैसर्गिक आघाड्या पाहिल्या आहेत.
काँग्रेस आणि भाजपाने एकत्र येणे,
आता अशाच गोष्टी राहिल्या आहेत.

उद्या असेसुद्धा होऊ शकते,
याचेच तर आजकाल लक्षण आहे !
सर्वांचा अजेंडा एकच असेल,
तो म्हणजे लोकशाहीचे रक्षण आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6520
दैनिक पुण्यनगरी
4जुलै 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...