Saturday, July 2, 2022

आलटा पालट... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

आलटा पालट

सरकार बदलले म्हणजे,
नेमके असे काय होते?
उपाशी कार्यकर्त्यांची,
आलटून पालटून सोय होते.

निराशेच्या ढगाआडूनच,
नव्या आशा उगत असतात !
उद्याच्या आशेवरच,
कार्यकर्ते जगत असतात!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7971
दैनिक झुंजार नेता
2जुलै2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...