आजची वात्रटिका
---------------------
आकडेशाही
मनाचा होतो तिळपापड,
अंगाची तर लाही लाही आहे.
आजची लोकशाही म्हणजे,
निव्वळ आकडेशाही आहे.
माकडे असोत वा खोकडे,
पाठीशी फक्त आकडे पाहिजेत !
सगळ्या जुळवाजुळवीसाठी,
हातात टाकडे टुकडे पाहिजेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7979
दैनिक झुंजार नेता
6जुलै2022
No comments:
Post a Comment