Wednesday, July 20, 2022

हम दो..हमारे दो.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------

हम दो..हमारे दो....

आमदार गेले,खासदार गेले,
जाणारे आजी आणि माजी आहेत
हकालपट्टी करता करता,
सेनापतींचे दिवस बिझी आहेत.

हम दो...हमारे दो....
असे म्हणण्याची पाळी आहे !
खरेच असे झाले तर म्हणू नका,
इतरांचीच जीभ काळी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7992
दैनिक झुंजार नेता
20जुलै2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...