आजची वात्रटिका
---------------------
अशी ही काटाकाटी
कुणी हळूच काढतो,
कुणी मात्र मोठ्याने काढतो.
जो तो आपला काटा,
शेवटी काट्याने काढतो.
काट्याने काटा काढला की,
काट्याचा नायटा होत नाही.
सगळे काम बेमालूम होते,
त्याचा मुळीच घायटा होत नाही.
कुठल्याही काटा - काटाचे,
असेच तर स्वरूप असते !
वर वर जखमा भरल्या तरी,
आत मध्ये मात्र कुरूप असते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-7995
दैनिक झुंजार नेता
23जुलै2022
No comments:
Post a Comment