Sunday, April 30, 2023

मेरे मन की बात....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
मेरे मन की बात
मोदी है तो सबकुछ मुमकीन है,
त्यासाठी प्रयत्नही अथक झाले.
त्यांच्या ' मन की बात' चे सुद्धा,
बघा बघता बघता शतक झाले.
कुणी ऐकले किंवा नाही ऐकले तरी,
आपण मन की बात केली पाहिजे.
उगीचच स्वतःचा कोंडमारा नको,
मळमळ तर बाहेर आली पाहिजे.
अविवाहितांपेक्षा विवाहितांच्या,
मनात खूप काही साचलेले असते !
जोडीदार ऐकत नसला तरी,
मनातले बरोबर पोचलेले असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6793
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
30एप्रिल2023

 

विजयी भव....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
विजयी भव
पराभव हा पराभव असतो,
विजय हा विजय असतो.
याचा अर्थ मात्र असा नाही,
प्रत्येकजण अजय असतो.
एखाद्याच्या अजयामागे,
एक गोष्ट दडलेली असते.
मातब्बर अशा भिडूशी,
त्याची गाठ पडलेली नसते.
विजयाच्या उन्मादाबरोबर,
पराभवाचीही खंत नको !
एखाद्या छोट्या अपयशाने,
आपल्या स्वप्नांचा अंत नको !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
दैनिक वात्रटिका
30एप्रिल2023

 

Saturday, April 29, 2023

लावणी आणि बैल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------


लावणी आणि बैल

तरण्याबरोबर म्हातारेही,
एकदम खुलायला लागले.
गौतमी पाटीलच्या ठेक्यावर,
बैलसुद्धा डोलायला लागले.

समोर कोणीही असो
तीच अदाकारी,तीच ढब आहे !
खुलले काय?डोलले काय?
फक्त सुपारीशी मतलब आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8243
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
29एप्रिल2023
 

मॉर्निंग कॉमेडी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मॉर्निंग कॉमेडी

आरोपा पाठोपाठ प्रत्यारोपाच्या,
पत्रकार परिषदा रंगायला लागल्या.
पत्थर का जवाब पत्थर से देंगे,
पत्रकार परिषदा सांगायला लागल्या.

पूर्व आणि उत्तर सभांपाठोपाठ,
उत्तर पत्रकार परिषदेचा फंडा आहे.
पूर्व आणि उत्तर पत्रकार परिषदेला,
ना बुडखा आहे, ना शेंडा आहे.

चोळा डोळे आणि बघा नीट,
ते वाट्टेल तसे छाटायला लागले !
पूर्व आणि उत्तर पत्रकार परिषदा,
आता कॉमेडी शो वाटायला लागले!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6792
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
29एप्रिल2023
 

Friday, April 28, 2023

बाजार समिती निवडणूक....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
बाजार समिती निवडणूक
अस्तित्वाच्या लढायांसाठी,
इथे प्रत्येकजण बेजार आहे.
आपला उत्पन्न वाढववायला,
कृषी समित्यांचा बाजार आहे.
कुणाचा उपाय तात्पुरता,
कुणाचा उपाय जालीम आहे.
आगामी निवडणुकांचीच,
ही रंगीत संगीत तालीम आहे.
वस्ताद जुने असले तरी,
समोर नवाट नवे चेले आहेत !
विना सहकार नाही उद्धार,
सगळेच कोळून प्याले आहेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
दैनिक वात्रटिका
28एप्रिल2023

 

भाकरीची फिरवाफिरवी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

भाकरीची फिरवाफिरवी

अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे,
ते मस्ती कशी जिरवत असतात?
भाकरी करपण्या अगोदरच,
भाकरी गर्रकन फिरवत असतात.

तवा कितीही तापलेला असो,
भाकरी मात्र शाबूत राहिली जाते.
कितीही आग आणि धूर निघू द्या,
परिस्थिती तर काबूत राहिली जाते.

त्यांची चूल, त्यांचीच भाकर आहे,
दुसऱ्यांचे मात्र गोंधळ माजू नयेत !
कारण नसताना कुणीही,
लष्कराच्या भाकऱ्या भाजू नयेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा-6791
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
28एप्रिल2023
 

Thursday, April 27, 2023

ढगात गोळ्या...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

ढगात गोळ्या

इथे तासा तासालाच,
भावी मुख्यमंत्री नवा आहे.
तो तो अंदाज ठोकून देतोय,
ज्याला जो मुख्यमंत्री हवा आहे.

ज्याला त्याला आपल्या मनातले,
अंदाज म्हणून लादायचे आहे !
जो मुख्यमंत्री होईल त्यालाच,
आकड्यांचे गणित साधायचे आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8242
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
27एप्रिल2023
 

चर्चेवर चर्चा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

चर्चेवर चर्चा

काही चर्चा मुद्दाम घडवल्या जातात,
काही चर्चा मुद्दाम दाबल्या जातात,
पॅनलवाले आणि चॅनलवालेसुद्धा,
आज भाडोत्री म्हणून राबल्या जातात.

इथे सर्व काही पूर्वलिखित असते,
इथे सर्व काही पूर्ववदीत असते !
ज्याला जसा स्वार्थ साधता येईल,
ते आपला स्वार्थ साधित असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा-6790
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
27एप्रिल2023
 

Wednesday, April 26, 2023

भावी मुख्यमंत्री


















 आजची वात्रटिका

------------------------


भावी मुख्यमंत्री


दारातले राजकारण घरातआले,

घरातले चुलीपर्यंत आणू लागल्या.

आजकाल बायकाही नवऱ्यांना,

भावी मुख्यमंत्री म्हणू लागल्या.


बायकांचे भाऊ,मेणाहून मऊ,

भावी मुख्यमंत्री आपला दाजी आहे.

आपल्या दाजीसाठी साल्यांची,

भावी मुख्यमंत्र्याची बॅनरबाजी आहे.


भावी मुख्यमंत्रीपदासाठीचे इच्छुक,

सगळ्यांनीच ओळखलेले आहेत!

म्हणूनच चांद्यापासून बांद्यापर्यंत,

उतावळे बॅनर झळकलेले आहेत!!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)

  मोबाईल-9923847269

----------------------------------

चिमटा-6789

दैनिक पुण्यनगरी

वर्ष -19वे

26एप्रिल2023

क्रिकेटची शैली....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

क्रिकेटची शैली

कुणी चौकार मारतो आहे,
कुणी षटकार मारतो आहे.
कुणी टिकी टिकी खेळून,
धावामागे धावा चोरतो आहे.

कुणाचा नोबॉल पडतो आहे,
कुणाचा गुगली पडतो आहे.
चक्क फुलटॉसवरतीही,
कुणाचा स्टंपच उडतो आहे.

कुणाच्या बॅटिंग स्ट्रोकचा,
इतरांपेक्षा नादच खुळा असतो!
रात्र थोडी सोंगे फार करणाराला,
नाईट वॉचमनचा लळा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8241
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
26एप्रिल2023
 

Tuesday, April 25, 2023

अविश्वास.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

 

आजची वात्रटिका
------------------------
अविश्वास
मित्राचा मित्रावर राहिला नाही,
शत्रूचा शत्रूवर राहिला नाही.
राजकारणाएवढा अविश्वास,
आम्ही कुठेच पाहिला नाही.
ज्याची त्याची शंका येते,
शंकेला खूप मोठा वाव आहे!
अविश्वास हेच जणू काही,
राजकारणाचे खरे नाव आहे!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8240
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
25एप्रिल2023

तीन तिघाडे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

तीन तिघाडे...

दुरुस्ती करायची ठेवली बाजूला,
रोज नवी नवी बिघाडी होत आहे.
जणू काही महाविकास आघाडीची,
रोज महाविकास तिघाडी होत आहे.

कुणाची उलट सुलट विधाने,
कुणी उगीचच गळे काढीत आहेत.
कुणी घेतोय एकट्याच सभा,
कुणी कुणी अफवा सोडीत आहेत.

कुणी आघाडीवर फिरवतोय नांगर,
कुणा कुणाची हळुवार निंदणी आहे !
तिघाडीकडून बिघाडीकडे,
महाविकास आघाडीची बांधणी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6788
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
25एप्रिल2023
 

Monday, April 24, 2023

सचिन नावाचा हिमालय

 


आठवणीतील वात्रटिका

-------------------------------


सचिन नावाचा

हिमालय



काढलेल्या प्रत्येक धावेला,

विक्रमाचे रूप घ्यावे लागते. 

हे ऐऱ्यागऱ्याचे काम नाही, 

त्यासाठी सचिनच व्हावे लागते.


सचिन बनणे सोपे असते. 

सचिन म्हणून टिकता आले पाहिजे! 

मास्टर-ब्लास्टर असतानाही, 

रोज नवे शिकता आले पाहिजे !!


-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)

मोबा.9923847269

-------------------------------------


सा. सूर्यकांती अंक 21वा दि 19 ऑक्टोबर 2010 पान-18


सा. सूर्यकांतीच्या........ ... आठवणीतला सचिन


SHIRA

मी मनातले सांगतो....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मी मनातले सांगतो

जसे काही काही लोकप्रतिनिधी,
काहींच्या मनातले असू शकतात.
तसे काही काही लोकप्रतिनिधी,
प्रत्यक्षात जनातले असू शकतात.

मनातलाम अमका,मनातला तमका,
याला तर हल्ली खूपच चेव आहे.
मित्र पक्षा - पक्षातील असंतोषाला,
मनातल्या मनामध्ये नवे पेव आहे.

मनामध्ये कुणी एक असतो,
प्रत्यक्षात मात्र कुणी दुसरा आहे!
आपल्या वैफल्याला आणि विरहाला,
हा पोकळ शाब्दिक आसरा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-6787
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
24एप्रिल2023
 

कुचाळ सभा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
कुचाळ सभा
नेत्यांना कार्यकर्ता नावाची जमात,
जशी वाटेल तशी बहिकावी लागते.
त्यामुळेच आपल्यालाही त्यांची,
फकत कुचाळकी ऐकावी लागते.
वाट्टेल ते वाट्टेल तसे बोलण्याच्या,
जणू एकमेकांना मुभा दिल्या आहेत.
विचार सभा आणि प्रचार सभा,
हल्ली कुचाळसभा झाल्या आहेत!
टवाळकी आणि कुचाळकी,
हे अवगुण आता गुण झाले आहेत!
हश्या,टाळ्या आणि शिट्ट्यांपपुढे,
वक्तेसुद्धा आता लीन झाले आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8239
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
24एप्रिल2023

 

Sunday, April 23, 2023

इंस्टारील ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
इंस्टारील
आज-काल रील मध्ये तर,
फारसे काही थ्रील राहिले नाही.
दाखवायचे राहिले आहे,
असे कोणतेच स्किल राहिले नाही.
थोडेफार नक्कीच चांगले आहे,
बाकी बीभत्स आणि वंगाळ आहे.
इन्स्टा म्हणजे तुंबलेल्या गटाराला,
वाट देणारे चंगाळच्या चंगाळ आहे.
नको नको तेथे बघावे लागते,
नको नको तेथे दाखवित आहेत!
फिल्टर असूनही नसल्यासारखे,
जे जे विकते;ते त पिकवित आहेत!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
फेरफटका-8238
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
23एप्रिल2023-


बदलत्या काळाची गरज...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

बदलत्या काळाची गरज

आज-काल हल्लेखोर तर,
कुणाच्याही वेषात यायला लागले.
कधी होतात पत्रकार,
तर कधी वकील व्हायला लागले.

कायदा आणि सुव्यवस्थेची,
त्यामुळेच तर बोंबाबोंब आहे.
खरा धोक्यामध्ये तर,
लोकशाहीचा प्रत्येक खांब आहे.

आता स्वतःचीच बदनामी,
प्रत्येक खांबाने टाळली पाहिजे!
लोकशाहीच्या चारही खांबांनी,
स्वतःच लोकशाही पाळली पाहिजे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------------
चिमटा-6786
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
23एप्रिल2023


Saturday, April 22, 2023

ऑपरेशन फोडाफोडी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

 

आजची वात्रटिका
------------------------

ऑपरेशन फोडाफोडी

पूर्वी पक्ष जोडणे हे टार्गेट होते,
आता पक्ष फोडणे हे टार्गेट आहे.
जे जे फोडायचे आहेत,
त्यांचा त्यांचा वेगवेगळा रेट आहे.

ज्यांच्या हाती सत्तेचे केंद्र,
त्यांचे टार्गेट पटकन पुरे होते !
ज्यांचे फोडले त्यांना कळतही नाही,
झालेले ऑपरेशन खरे होते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
फेरफटका-8237
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
22एप्रिल2023

कौन बनेगा मुख्यमंत्री?....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

कौन बनेगा मुख्यमंत्री?

कोण जातील? कोण येतील?
याची तशी कुणालाच हमी नाही.
महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्र्यांची,
तशी अजिबातच कमी नाही.

काल म्हणे त्याचा पिच्छा होता,
आज म्हणे याचा पिच्छा आहे.
प्रत्येकालाच मुख्यमंत्रीपदाची,
अगदी शंभर टक्के इच्छा आहे.

फक्त इच्छा असून भागत नाही,
आकडेही जुळवता आले पाहिजेत!
जनतेबरोबर हायकमांडचेही,
आशीर्वाद मिळवता आले पाहिजेत!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6785
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
22एप्रिल2023
 

Friday, April 21, 2023

साई सुट्ट्या.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

साई सुट्ट्या.....

खारघरला लागल्या उन्हाच्या झळा,
आता एप्रिलमध्येच बंद झाल्या शाळा.
सगळे म्हणा,साई सुट्ट्या.......
चला..नाचू....गाऊ....हसा.....खेळा.

अध्यापन कार्य बंद;शाळा चालूच,
तरीही वर्षानुवर्ष हेच पचले आहे.
देर आये,लेकीन दुरुस्त आये...
वाढत्या उन्हामुळे तरी हे सुचले आहे.

यानिमित्ताने सगळ्याच सुट्ट्यांचा,
एकदा तरी पुनर्विचार झाला पाहिजे!
गोरा इंग्रज केंव्हाच गेला,
पण सुट्ट्यांमागचा विचार गेला पाहिजे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-8236
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
21एप्रिल2023
 

पॉलिटिकल सिग्नल..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

पॉलिटिकल सिग्नल

कुणाची निरवानिरव चालू आहे.
कुणाची सावरासावर चालू आहे.
कुणी झालाय कावराबावरा,
कुणाची आवराआवर चालू आहे.

कुणी मारतोय ढगात गोळ्या,
कुणी हवामानाचा अंदाज घेत आहे.
गाड्यांबरोबर नळ्यांची तर,
नेहमीप्रमाणेच यात्रा होत आहे.

कुणी करतोय चलबिचल,
कुणी निश्चयी आणि ठाम आहे !
ग्रीन सिग्नलची वाट बघत बघत,
सध्या ट्राफिकसुद्धा जाम आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6784
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
21एप्रिल2023
 

Thursday, April 20, 2023

मनाचेच श्लोक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मनाचेच श्लोक

सदा सर्वदा योग तुझा घडावा,
पुरस्कारासाठी देह माझा पडावा.
उपेक्षू नका,माझ्यातल्या गुणवंता,
हे महाराष्ट्रभूषणा मागणे हेचि आता.

झाला उष्माघात,कोरड घशाला,
किती गेले,मेल्याचि चिंता कशाला?
धर्मकारणात घुसलेले राजकारण,
मतपेटीच्या गॅरंटीला भक्तच तारण.

डोक्यात धर्म,धोक्यात अधिकारी,
पुरस्काराचा झाला तिरस्कार भारी!
दुःख मोठे झाले महाराष्ट्र देशाला,
चाराण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8235
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
20एप्रिल2023
 

इंडिया नंबर वन..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

इंडिया नंबर वन

चिनी कम;भारत ज्यादा,
असे म्हणण्याची वेळ आली आहे.
आता भारताची लोकसंख्या,
चीनपेक्षासुद्धा जास्त झाली आहे.

आपला हात धरू शकेल,
सांगा आज तरी जगात कोण आहे?
लोकसंख्येच्या बाबतीत,
आता भारतच जगात नंबर वन आहे.

जागतिक लोकसंख्या वाढीत,
भारताचा हातभार खूप मोठा असेल!
लोकसंख्या वाढीच्या कारणात
लोडशेडिंगचा सिंहाचा वाटा असेल!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6783
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
20एप्रिल2023
 

Wednesday, April 19, 2023

भ्रमनिरास...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

भ्रमनिरास

फुग फुग् फुगवलेल्या,
फुग्यातली हवा काढून घेतली.
कुणी पडले उताणे,
कुणी थोबाडे फोडून घेतली.

कुणाचे गेले घशात दात,
कुणाची टांगा पलटी आहे.
कुणी सोडा सुटकेचा विश्वास,
कुणाला वाटते गिल्टी आहे.

कुणाची झाली अपेक्षापूर्ती,
कुणाचा मात्र भ्रमनिरास आहे !
लोकशाहीच्या तसबिरीपुढे,
अविश्वासाची आरास आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8234
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
19एप्रिल2023
 

स्वल्पविराम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

स्वल्पविराम

जिकडून आउटगोइंग आहे,
तिकडेहसुद्धा पेच आहे.
जिकडे इनकमिंग होणार आहे,
तिकडेसुद्धा तेच आहे.

इकडेही मळमळ आहे,
तिकडेही मळमळ आहे.
दादागिरीच्या दराऱ्याने,
जिकडे तिकडे खळबळ आहे.

ते पूर्णविराम म्हणाले तरी,
हा तर स्वल्पविराम आहे!
ऑपरेशन यशस्वी होईपर्यंत,
भित्र्यांचे जगणेच हराम आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6782
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
19एप्रिल2023
 

Tuesday, April 18, 2023

विश्वासघात...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

विश्वासघात

पुढे एकाच्या हाती हात आहे,
मागे एकाच्या हाती हात आहे.
राजकारणाचे दुसरे नाव,
म्हणूनच तर विश्वासघात आहे.

विश्वासघात करूनच्या करून,
समर्थांची थिअरी मांडली जाते.
विश्वासाबरोबर इमानदारीही,
पार कांड कांड कांडली जाते.

कधी विश्वासघात लपून-छपून,
तर कशी कधी ओपन असते!
जो कुणी बनतो धृतराष्ट्र,
त्याच्या डोळ्यावर ढापण असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8233
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
18एप्रिल2023
 

ज्याची त्याची गॅरंटी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

ज्याची त्याची गॅरंटी

आपले दादा; एकच वादा,
महाराष्ट्र सरकार स्थिर आहे.
महाराष्ट्राला की सरकारला?
नेमका कुणाला धीर आहे?

महाराष्ट्र सरकारसाठी,
हा उन्हाळ्यातला गारवा आहे.
प्रत्यक्ष विरोधी पक्षालासुद्धा,
सरकारची किती पर्वा आहे.

तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच,
आज वेगवेगळी गॅरंटी आहे ?
येणारा काळच सांगू शकतो,
नेमकी कुणाची गॅरंटी करंटी आहे?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6781
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
18एप्रिल2023
 

Monday, April 17, 2023

सकारात्मक राजकीय विचार..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
सकारात्मक राजकीय विचार
नकारात्मकतेपेक्षा सकारात्मकता,
आपण प्रत्यक्षात आणली पाहिजे.
जे होते ते चांगल्यासाठीच होते,
ही गोष्ट तरी सर्वांनी जाणली पाहिजे.
कुणीही कोणत्याही पक्षात जाऊ द्या,
व्हायचे तर त्यांना मुख्यमंत्री होऊ द्या.
त्यांच्यामुळेच राज्य विधवा होत नाही,
हे कधीतरी सर्वांच्या लक्षात येऊ द्या.
फोडाफोडी ओढाओढी करणाऱ्यांचे
आपणच आभार मानले पाहिजेत!
आता आपणच आपल्यासाठी,
खरे अच्छे दिन आणले पाहिजेत!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6780
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
17एप्रिल2023

 

एन्काउंटरचे पोस्टमार्टम....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
एन्काउंटरचे पोस्टमार्टम
एन्काउंटरचा अर्थ,
बघा नेमका काय असतो?
एन्काउंटर म्हणजे,
रस्त्यावरचा न्याय असतो.
जो कुणाला न्याय वाटतो,
तोच कुणाला अन्याय वाटतो.
पुन्हा पुन्हा खोलात जाणारा,
बुडत्याचा पाय वाटतो.
कुठे एन्काउंटरचा जल्लोष,
कुठे एन्काउंटरचा वाद असतो!
बंदुकीच्या गोळीला तर,
फक्त रक्ताचा नाद असतो!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
फेरफटका-8232
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
17एप्रिल2023

 

Sunday, April 16, 2023

खुर्च्यांची वज्रमुठ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------
खुर्च्यांची वज्रमुठ
महाविकास आघाडीची,
बातच काही आगळी आहे.
सगळ्यांच्या नजरेत आले,
एकच खुर्ची वेगळी आहे.
कुणाचे आरोग्य बिघडलेले,
कुणी कुणी एकद फिट आहे.
संगित खुर्चीसरखा,
मानापमानाचा खेळ झूठ आहे.
जेवढे इरादे एक पाहिजेत,
तेवढे इरादे नेक पाहिजेत !
फक्त खुर्च्याच सारख्या नकोत,
खुर्च्यांवरचे एक पाहिजेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
दैनिक वात्रटिका
16एप्रिल2023

 

गंगा म्हणाली भागीरथीला...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

गंगा म्हणाली भागीरथीला

मी म्हणजे तू;तू म्हणजे मी,
तरी मी तुझ्या आधी आहे.
याचा अर्थ मुळीच असा नाही,
मीसुद्धा नामांतरवादी आहे.

तुला मला पुढे करून,
नेमके काय साधणार आहेत?
विधवा ह्या विधवाच राहतील,
त्या थोड्याच सधवा होणार आहेत?

नामांतराने प्रश्न निर्माण होतात,
नामांतराने प्रश्न सुटत नाहीत !
कालचे अपंग आज दिव्यांग झाले,
नाममात्रही संतुष्ट भेटत नाहीत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------
चिमटा-6779
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
16एप्रिल2023
 

Saturday, April 15, 2023

अध्यात्मिक चंगळवाद

आजची वात्रटिका
------------------------

अध्यात्मिक चंगळवाद

कुणालाही आश्चर्य वाटावे,
असा प्रकार घडतो आहे.
अध्यात्मिक चंगळवाद तर,
सप्त्या सप्त्याला  वाढतो आहे.

होवू द्या की खर्च...
असा खर्चिक भाव आहे !
अध्यात्मिक चंगळवादाला,
भक्ती भाव हे नाव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8231
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
15एप्रिल2023
----------------------------------
मराठी वात्रटिका
*विशेष सूचना-*
1)माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करा.
२)सदरील वात्रटिकमध्ये काही टायपिंग मिस्टेक असेल तर मला कळवा.
३) वैयक्तिक अभिप्रायाचे स्वागत.
जे वात्रटिका शेअर करत आहेत त्यांचे विशेष आभार.
4) माझ्या प्रसिद्ध असलेल्या 18 हजारांपेक्षा जास्त वात्रटिका 8 हजार पेक्षा जास्त वात्रटिका एका क्लिकवर वाचू शकता
https://suryakantdolase.blogspot.com/?m=1
५) माझ्या बाल वात्रटिका वाचण्यासाठी क्लिक करा
https://balsuryakanti.blogspot.com
६) सर्व काही एकाच ठिकाणी...एकाच ठिकाणी !! अर्थात *सप्ताहिक* *सूर्यकांती* खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पाहिले आणि एकमेव साप्ताहिक https://weeklysuryakanti.blogspot.com
7) माझ्या *सूर्यकांती लाईव्ह* किंवा यूट्यूब चॅनलला कृपया भेट द्या...लाईक करा...*सबस्क्राईब* करा !! https://www.youtube.com/user/suryakantdolase
8 )आजपर्यंतचे सर्व वात्रटिका संग्रह डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
https://vatratikaebooks.blogspot.com
९)माझ्या शेकडो कविता वाचण्यासाठी क्लिक करा
https://surykanti.blogspot.com
१०) माझ्या विडंबन कविता वाचण्यासाठी किलक करा
https://suryakanti1.blogspot.com
प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
-सूर्यकांत डोळसे
15एप्रिल2023

ना शॉकिं, ना ब्रेकिंग...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

ना शॉकिं, ना ब्रेकिंग

राजकीय भूकंपाची पूर्वसूचना,.
आजकाल जो तो देऊ लागला.
पहाटेचा शपथविधी तर,
महाराष्ट्राच्या स्वप्नात येऊ लागला.

राजकीय तर्क वितर्कांनाही,
तसा सगळीकडूनच उत आहे.
लोकांचे आपत्ती व्यवस्थापन,
सध्या चांगलेच मजबूत आहे.

लोकांची मानसिक तयारी झाली,
त्यांच्यासाठी काहीच शॉकिंग नाही!
कुणाच्याही सूत्रांनी दिली तरी,
लोकांसाठी ती न्यूज ब्रेकिंग नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------
चिमटा-6778
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
15एप्रिल2023
 

Friday, April 14, 2023

संघटन विकृती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

संघटन विकृती

सामाजिक संघटना म्हणजे,
गुंडा पुंडांच्या टोळ्या झाल्या.
सामाजिक संघटना नावाच्या,
जगजाहीर होळ्या झाल्या.

संघटनाच्या नावाखाली,
गुंडगिरीला आधन आले.
सामाजिक संघटना म्हणजे,
उदरनिर्वाहाचे साधन झाले.

संघटन आणि समाजसेवा,
ह्या तर त्यांच्या फपाऱ्या आहेत !
रोज कुणाच्या ना कुणाच्यातरी,
त्यांना राजरोस सुपाऱ्या आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8230
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
14एप्रिल2023
 

मोर माचाये शोर....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

मोर माचाये शोर

जंगलातले सगळेच मोर,
थयथयाट करीत नाचू लागले.
घाबरलेल्या मनाने,
हनुमान चालीसा वाचू लागले.

वन्स मोअरचा आग्रह.
मोरच मोरांना धरू लागले.
हनुमान चालीसा सोबत,
रामनामाचा शोर करू लागले.

नाही तरी दुसरे काय?
बिचाऱ्या मोरांच्या हाती आहे?
राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जायची,
आजकाल मोरांनाही भीती आहे!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-6777
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
14एप्रिल2023
 

Thursday, April 13, 2023

सावधान !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

सावधान !

आज डोकी घडवणाऱ्यांपेक्षा,
डोकी बिघडणारे जास्त झाले.
डोकी घडवणारे झाले महाग,
डोकी बिघडवणारे स्वस्त झाले.

सवंगता आणि उथळता,
आजच्या स्वास्ताईचे नाव आहे.
बाजारच एवढा उतावीळ की,
आज आगलाव्यांनाच भाव आहे.

सकारात्मकता दिली सोडून,
नकारात्मकता वेचीत आहेत!!
समाजाला पुढे न्यायचा सोडून
समाजाला मागे खेचीत आहेत!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8228
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
13एप्रिल2023
 

भेटी - गाठी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

भेटी - गाठी

लटके रागवत ती म्हणाली,
अचानक भेटत जाऊ नकोस.
मला एकांतात कुठेतरी,
तू असा गाठत जाऊ नकोस.

लोकांना तुझ्या भेटीगाठी,
कुठून तरी कळत असतात.
काही नजरा छळतात,
काही नजरा जळत असतात.

आपल्या वाटा निराळ्या,
तरीही तू माझा श्वास आहे.
सरावलेल्या नाकांना,
भेटीत राजकीय वास आहे.

तुझ्या भेटीची नशाच वेगळी,
तुझी भेट म्हणजे शराब आहे!
सतत हवीहवीशी वाटली तरी,
हा जमाना खूप खराब आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------------
चिमटा-6776
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
13एप्रिल2023
 

दैनिक वात्रटिका29मार्च2024....वर्ष- तिसरे..अंक -296वा

दैनिक वात्रटिका 29मार्च2024....वर्ष- तिसरे.. अंक -296वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/16Y5CPWm1eVe-mvmywM7Inn...