Wednesday, April 12, 2023

सुसंवाद आणि विसंवाद..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

सुसंवाद आणि विसंवाद

सत्ता हाती असली की,
मित्रपक्षातला सुसंवाद वाढतो.
सत्ता हाती नसली की,
मित्रपक्षातला विसंवाद वाढतो.

मित्र पक्षांच्या वर्तनातून,
एक मात्र पक्के लक्षात येते आहे.
विसंवाद आणि सुसंवादाचे,
सत्तेशी अगदी पक्के नाते आहे.

सत्ता हाती असली की,
विसंवादालाही गौण धरले जाते!
चुकून विसंवाद वाढलाच तर,
सत्तेसाठी तरी मौन धरले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------------
चिमटा-6775
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -19वे
12एप्रिल2023
 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...