Monday, June 6, 2022

गेट-टुगेदर... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------
गेट-टुगेदर
भूतकाळातले मित्र -मैत्रिणी,
खूप वर्षानंतर भेटू लागले.
उजळून येतात आठवणी,
छोटे झाल्यासारखे वाटू लागले.
सुख -दुःखाची देवाण-घेवाण,
हा निखळ मैत्रीचा सार असतो !
तरीही अतृप्त आत्म्यांचाच,
गेट टुगेदरमध्ये पुढाकार असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
सूर्यकांती
6जून 2022

 

बहुमताचा ओव्हर डोस ,,,प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बहुमताचा ओव्हर डोस कुणालाच जेवढी अपेक्षा नव्हती, त्यापेक्षा जास्त बहुमत आज आहे. कुणाला बहुमताचा राक्षसी आ...