आजची वात्रटिका
----------------------------
गळफास
त्यांच्या संसारवेलीमध्ये,
उगीच वेठीस धरतात झाडाला.
वटपौर्णिमेची भीती वाटते,
घाबरत वड म्हणाला वडाला.
त्याला ह्या जन्माची भीती,
तिला सात जन्माची आस आहे !
या हास्यास्पद कार्यक्रमात,
आपल्या गळ्याला फास आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7958
दैनिक झुंजार नेता
14जून2022
No comments:
Post a Comment