आजची वात्रटिका
---------------------
पृथ्वी गोल आहे
कुठे महाराष्ट्र अन्,
कुठे वाटाघाटी आहे?
महाराष्ट्राची राजधानीच,
जणू गुवाहाटी आहे.
महाराष्ट्राच्या ताबेदारीसाठी,
उलटी सुलटी चर्चा आहे.
सुरत व्हाया गुवाहाटी,
असा दिल्लीकडे मोर्चा आहे.
राजकीय भूमिकांचा तर,
सगळाच झोल आहे !
कुठेही गेलात तरी,
शेवटी पृथ्वी गोल आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6513
दैनिक पुण्यनगरी
27जून 2022
No comments:
Post a Comment