आजची वात्रटिका
----------------------
आक्रोश
हे म्हणतात,त्यांचा दोष आहे,
ते म्हणतात,यांचा दोष आहे.
रोषाने रोष वाढत गेला,
त्याचाच आज आक्रोश आहे.
मूळ प्रश्न सोडविणेपेक्षा,
आज आक्रोशावर जोर आहे !
जनतेची काळजी कुणाला?
हा तर वेगळाच घोर आहे.
आज जनतेचा घोर असणारे,
पूर्वी काय घोरत होते ?
त्यांचे त्यांनाच माहीत असेल,
नेमके पाणी कुठे मुरत होते ?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6501
दैनिक पुण्यनगरी
16जून 2022
No comments:
Post a Comment