आजची वात्रटिका
---------------------
श्रेयवादाचा सिद्धांत
कुणाकडून श्रेय वाटले जाते,
कुणाकडून श्रेय लाटले जाते.
श्रेय वादाच्या लढाईत,
श्रेयाचे भांडे नक्की फुटले जाते.
श्रेयासाठी भांडा-भांडी असते,
श्रेयासाठी दांडा-दांडी असते.
कोनशिला आणि बॅनर्सची,
एकमेकांवर झेंडा-झेंडी असते.
झेंडा-झेंडी आणि दांडा दांडी,
ही तर केवळ एक झांकी आहे !
अजून दुसऱ्यांच्या लेकरा-बाळावर,
हक्क सांगायचे बाकी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6504
दैनिक पुण्यनगरी
19जून 2022
No comments:
Post a Comment