Thursday, June 9, 2022

इरादा पक्का.... मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
----------------------
इरादा पक्का
जशास तसे आहेत,
ठोश्यास ठोसे आहेत.
त्यांचे हाडवैर कायम,
पाण्यातले मासे आहेत.
मतभेद मिटले तरी,
त्यांना वैर असावे वाटते.
सत्तेच्या नशेसाठी,
एकत्र बसावे वाटते.
सत्तेच्या नशेसोबत,
मैत्रीचा चकणा असतो!
सत्तेची नशा चढताच,
लोकमताचा बुकणा असतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-7954
दैनिक झुंजार नेता
9जून2022

No comments:

daily vatratika...29jane2026