आजची वात्रटिका
----------------------
अपक्षीय 'मत' प्रदर्शन
लिंबुला म्हणाला टिंबू,
गड्या नको एवढे तुंबू.
आडवा उभा घुसायचा,
धाडकन ईडीचा बांबू.
जसा तिकडे आड आहे,
तशी इकडे विहीर आहे.
आपल्या नावाने,
घोडेबाार जाहीर आहे.
आपण अपक्ष असूनही,
आपल्यावरच लक्ष आहे!
हाल आणि चालीला,
आपलीच साक्ष आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6498
दैनिक पुण्यनगरी
7जून 2022

No comments:
Post a Comment