आजची वात्रटिका
----------------------
कार्यकर्ते
दुसऱ्याचे फितवावे लागतात,
आपले मात्र चेतवावे लागतात.
टांगलेले गाजर देऊन,
कार्यकर्ते गुतवावे लागतात.
कार्यकर्ते निर्यात करता येतात,
कार्यकर्ते आयात करता येतात.
कार्यकर्ते तात्पुरते नाही,
कार्यकर्ते तहहयात करता येतात.
त्यांचा विश्वास कमवला जातो,
आपण तेवढ्यापुरता ठेवला जातो !
निष्ठेचे दाखले देत देत,
कार्यकर्ता कार्यकर्ता ठेवला जातो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6495
दैनिक पुण्यनगरी
4जून 2022

No comments:
Post a Comment