आजची वात्रटिका
----------------------
वटपौर्णिमेचे सेलिब्रेशन
कुणी मारल्या दांड्या,
कुणी कुणी रजा घेतली.
कुणी कॉमन ऑफ घेवून,
वटपौर्णिमेची मजा घेतली.
यावर जोतिबा बोलले,
साऊ,निराश नको होऊ.
आपल्याच लेकींना,
साऊ,असा दोष नको देवू.
कथनी आणि करणीत,
जास्त अंतर पडते आहे!!
आर्थिक सबलतेबरोबर,
वैचारिक निर्बलता वाढते आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-7960
दैनिक झुंजार नेता
15जून2022
No comments:
Post a Comment