Tuesday, June 14, 2022

ज्याचा त्याचा बाजारभाव.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

ज्याचा त्याचा बाजारभाव

नाहीतरी आपल्या लोकशाहीला,
घोडेबाजाराचा आजार आहे.
त्यांचा घोडेबाजार असेल तर,
आपलासुद्धा गाढवबाजार आहे.

घोडेबाजार असो वा गाढवबाजार,
देणारेसुद्धा अगदी मुक्याने देतात !
चपटी आणि बोटी चोख्यांनो,
ते तर चक्क खोक्या खोक्याने घेतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6501
दैनिक पुण्यनगरी
14जून 2022

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...