Friday, June 10, 2022

पावसाचा धावा... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------

पावसाचा धावा

होम करा,हवन करा,
महादेवालाही कोंडा रे.
भुंडी गरगरत म्हणाली,
पाऊस झाला भुंडा रे.

बेडूक अथवा गाढव,
कुणाचे तरी लग्न लावा रे.
आपल्या हनीमूनसाठी,
लबाड कोल्ह्याचा कावा रे .

नक्षत्र बिक्षत्र न बघता,
पाऊस एकदाचा यावा रे !
वेधशाळांची तरी अब्रू राख,
पावसाला शंकोबाचा धावा रे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6498
दैनिक पुण्यनगरी
10जून 2022

 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...