आजची वात्रटिका
---------------------
बंड
आपल्या कर्तृत्व आणि मेहनतीचे,
जेंव्हा अगदीच शून्य चीज असते.
नेमके तिथेच तर,
बंडखोरीचे सुप्त असे बीज असते.
कधी आतून,कधी बाहेरून,
बंडखोरीला खतपाणी घातले जाते.
आग विझू नये यासाठी तर,
धुमसत्या आगीत तेल ओतले जाते.
बंड यशस्वी होवो वा अयशस्वी,
शेवटी बंडाला बंड म्हणावे लागते !
जे होते ते चांगल्यासाठीच,
असे नाविलाजाने म्हणावे लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-----------------------
चिमटा-6509
दैनिक पुण्यनगरी
22जून 2022
No comments:
Post a Comment